पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊतांचं नाव कसं आलं?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण चर्चेत असून, आता संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं कसं आलं?

ADVERTISEMENT

पत्रा चाळ जमीन प्रकरण काय?

गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत करार केला होता. करारानुसार गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 पेक्षा अधिक फ्लॅट बांधायचे होते. या एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष फ्लॅटकडे राहणार होते.

पत्रा चाळ जमीन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप काय?

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

हे वाचलं का?

या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.

मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW (आर्थिक गुन्हे शाखा) ने अटक केली होती, तर सारंग वाधवान अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता.

पत्रा चाळ जमीन घोटाळा : संजय राऊत यांना अटक! ईडीची कारवाई, शिवसेनेला मोठा धक्का

ADVERTISEMENT

फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीनं नोंदवला होता.

पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांचं नावं कसं आलं?

प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.

ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.

या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केलेली आहे. याच प्रकरणात ईडीने १ जुलै २०२२ रोजी संजय राऊत यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. या चौकशीनंतर ईडीने २० जुलै रोजी ईडीकडून पुन्हा समन्स बजावलं होतं. उपस्थित न राहिल्याने संजय राऊत यांना २७ जुलैला राऊतांना दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. पावसाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT