Share Market : शेअर मार्केट सध्या तेजीत आहे, त्यानिमित्ताने जाणून घ्या काय असतं शेअर मार्केट, सेन्सेक्स आणि निफ्टी?

मुंबई तक

सेन्सक्सने आज ऐतिहासिक उसळी घेतली, निफ्टी आपटला, शेअर मार्केटमध्ये तेजी, अशा हेडलाईन्स, बातम्या, चर्चा तुम्ही अनेकदा ऐकत असाल, पण प्रत्येकालाच यातलं खोलात ज्ञान असेल असं नाही. अनेक जण तर पेपरमधला बिझनेस पेजपर्यंत जातच नाहीत, किंवा ते बाजुला सारून पुढे जातात. तसा पैसा तर सगळ्यांच्या कामाचा आहे, आज-कालच्या जमान्यात तर कोण म्हणणार नाही की मला पैशांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सेन्सक्सने आज ऐतिहासिक उसळी घेतली, निफ्टी आपटला, शेअर मार्केटमध्ये तेजी, अशा हेडलाईन्स, बातम्या, चर्चा तुम्ही अनेकदा ऐकत असाल, पण प्रत्येकालाच यातलं खोलात ज्ञान असेल असं नाही. अनेक जण तर पेपरमधला बिझनेस पेजपर्यंत जातच नाहीत, किंवा ते बाजुला सारून पुढे जातात. तसा पैसा तर सगळ्यांच्या कामाचा आहे, आज-कालच्या जमान्यात तर कोण म्हणणार नाही की मला पैशांची गरज नाही. मग पैशांवरून चालणाऱ्या शेअर बाजारची माहिती घेण्यात तरी मागे का राहायचं? त्यामुळेच सेन्सेक्स-निफ्टी वधारला आणि आपटला ह्या गोष्टी फक्त दररोज ऐकण्यापेक्षा आज त्यांची माहिती थोडक्यात समजून घेऊयात.

Hindi Din : हिंदी भारताची राष्ट्रभाषा का नाही? समजून घ्या

तीन प्रमुख गोष्टी ज्या आपण समजून घेऊ…शेअर बाजार म्हणजे काय? सेन्सेक्स आणि ऩिफ्टी म्हणजे काय?

1. शेअर मार्केट- शेअर्स म्हणजे हिस्सा…शेअर बाजार म्हणजे याच हिस्सेदारांचा बाजार. ज्या लिस्टेड कंपन्या असतात त्यांची संपत्ती आणि मालकी हक्क हिस्स्यांमध्ये विभागलेला असतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp