उद्धव ठाकरेंना ‘फ्रेंडशिप-डे’च्या काय शुभेच्छा देणार?, एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई तक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक घेतली. जुलै 2019 नंतर गव्हर्निंग कौन्सिलची ही पहिली वैयक्तिक बैठक होती. नीती आयोगाच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तेलबिया आणि कडधान्ये तसेच कृषी-समुदायांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पीक विविधीकरण यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. या गव्हर्निंग […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक घेतली. जुलै 2019 नंतर गव्हर्निंग कौन्सिलची ही पहिली वैयक्तिक बैठक होती. नीती आयोगाच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तेलबिया आणि कडधान्ये तसेच कृषी-समुदायांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पीक विविधीकरण यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फ्रेंडशिप-डे च्या प्रश्नावरती काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज फ्रेंडशिप-डे आहे आणि तुमचे सर्व आमदार असं म्हणत आहेत की लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मैत्री होणार आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांना फ्रेंडशिप-डेच्या शुभेच्छा देणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे गप्प राहिले. ते म्हणाले “फ्रेंडशीप डे सर्वांसाठी असतो, माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत”, असं म्हणून शिंदे यांनी वेळ मारून नेली.

निती आयोगाच्या बैठकीत प्रामुख्याने कशावर झाली चर्चा?

* सिंचन क्षेत्रावर भर राहणार आहे.

* सेंद्रीय शेतीकडे लक्ष देणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp