MLC : मुख्याध्यापक ते आमदार; ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषदेच्या पाच जागांपैकी पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघात बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)

या निवडणुकीत एकूण 35 हजार 700 वैध मतं ठरली होती. ज्यापैकी ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पहिल्या पसंतीची 20 हजार 648 मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. तर बाळाराम पाटील यांना अवघी 9 हजार 500 मतं मिळाली. पसंती क्रमाच्या सुत्रानुसारचा कोटा पूर्ण करत पहिल्याच फेरीत म्हात्रेंनी बाळाराम पाटील यांच्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना पाणी पाजलं. त्यामुळे या विजयानंतर नेमकं ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत तरी कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे.

MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे?

ज्ञानेश्वर बराकु म्हात्रे. हे मुळचे बदलापूरमधील आहेत. शिवसेना पक्षाची पार्श्वभूमी असलेले म्हात्रे बदलापूरमध्ये शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून तिथं ते मुख्याध्यापक म्हणून काम करतात. याशिवाय अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्येही ते संचालक म्हणूनही काम पाहतात.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख आहेत. वामन म्हात्रे यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. राजकीय पार्श्वभूमी आणि शिक्षकांमध्ये चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी मागील सात ते ८ वर्षांपासूनच शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून विधान परिषदेसाठी काम करायला सुरुवात केली होती.

ADVERTISEMENT

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

ADVERTISEMENT

यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात उतरलेले होते. त्यावेळी शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ इतकी मते मिळाली होती. तर विरोधातील बाळाराम पाटील ११ हजार ८३७ मते मिळवून विजय झाले होते. त्यानंतर त्यांनी अगदी यंदाचा प्रचार संपेपर्यंत शिक्षक सेना आणि राज्य मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून कोकण विभाग पिंजून काढला. शिक्षक मतदारांची सर्वाधिक नोंदणी करुन घेतली. अखेर म्हात्रेंनी, विधान परिषदेवर विजय मिळवला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT