सचिन वाझेंची कारकीर्द: एन्काउंटर स्पेशालिस्ट ते शिवसेना प्रवेश
मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घातापताचा संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविषयी देखील या प्रकरणावरुन त्यांनी काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सचिन वाझे यांचं […]
ADVERTISEMENT

मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घातापताचा संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविषयी देखील या प्रकरणावरुन त्यांनी काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सचिन वाझे यांचं नाव चर्चेत आलं आहे.
सचिन वाझे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने एक वादग्रस्त पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत बऱ्याच प्रकरणावरुन त्यांच्यावर टीका झाली आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा सचिन वाझे यांचं नाव थेट विरोधी पक्ष नेत्यांकडून समोर आलं आहे. त्यामुळे वाझेंविषयी पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. जाणून घ्या सचिन वाझेंविषयी नेमकी माहिती.
सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण?
सचिन हिंदुराव वाझे हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला. 1990 साली ते पोलीस दलात सामील झाले होते. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. मात्र दोन वर्षातच म्हणजे 1992 साली त्यांची बदली थेट ठाण्यासारख्या शहरी भागात करण्यात आली होती. ठाण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच चर्चेत होते. दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश करण्यात आला होता.