पुण्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण! गर्भवती महिलांना जास्त धोका… काय आहेत लक्षणे?
पुणेकरानों काळजी घ्या… असं आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुणे शहरात धोकायदायक असलेल्या झिका व्हायरसने चंचुप्रवेश केलाय. पुण्यातील बावधन परिसरात एका 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरचा संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे महापालिका आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पुणे शहरात झिकाचा रुग्ण पुणे शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. […]
ADVERTISEMENT

पुणेकरानों काळजी घ्या… असं आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुणे शहरात धोकायदायक असलेल्या झिका व्हायरसने चंचुप्रवेश केलाय. पुण्यातील बावधन परिसरात एका 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरचा संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे महापालिका आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात झिकाचा रुग्ण
पुणे शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णाचे 67 वर्ष आहे. रुग्ण पुण्यातील बावधन परिसरातील आहे.
ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवत असल्याने सदरील रुग्ण 16 नोव्हेंबर जहांगीर रुग्णालयात आली होती. बाह्यरुग्ण विभागात व्यक्तीची तपासणी करण्यात आली. व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. 18 नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या अहवालात या व्यक्तीला झिका विषाणू संबंधित असल्याचं स्पष्ट झालं.
त्यानंतर व्यक्तीचे नमुने पुण्यातील एनआयव्ही पुणे येथे तपासणी पाठवण्यात आले. 30 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या अहवालानुसार सदरील रुग्णाला झिका व्हायरची लागण झालेली असल्याचं निश्चित झालं. झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पुणे महापालिकेकडून रुग्ण सापडलेल्या भागात रोग नियंत्रण योजना सुरू करण्यात आली.