स्वाभिमानी नेते रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई तक

– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते असलेल्या तुपकरांचं गेल्या ३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना बुलढाण्यात राहत्या घरी पाठवलं आहे. दरम्यान तुपकरांच्या या आंदोलनाला स्थानिक शेतकऱ्यांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते असलेल्या तुपकरांचं गेल्या ३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना बुलढाण्यात राहत्या घरी पाठवलं आहे.

दरम्यान तुपकरांच्या या आंदोलनाला स्थानिक शेतकऱ्यांचा चांगलाच पाठींबा मिळताना दिसत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जागोजागी रास्तारोको केला. ज्यात औरंगाबाद-अमरावती, औरंगाबाद – नागपूर, बुलडाणा – अजिंठा, बुलडाणा – अकोला, बुलडाणा- चिखली, बुलडाणा- मलकापूर असे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले. सध्या तुपकरांना मिळणारा पाठींबा लक्षात घेता विदर्भ आणि मराठवाड्यात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp