पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातलं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचं म्हटलं आहे. ‘काँग्रेसचे खुनी इरादे फसले’, PM मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीनंतर स्मृती इराणी संतापल्या काय […]
ADVERTISEMENT

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातलं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचं म्हटलं आहे.
‘काँग्रेसचे खुनी इरादे फसले’, PM मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीनंतर स्मृती इराणी संतापल्या
काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?
पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.