पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! राणीची बाग १ नोव्हेंबरपासून खुली होणार
कोरोना काळात बंद असलेलं मुंबईतलं वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी राणीची बाग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू कोविडचा अद्याप न टळलेला धोका लक्षात घेता राणीच्या बागेतील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्राणी संग्रहालयातील तिकीट खिडकी […]
ADVERTISEMENT

कोरोना काळात बंद असलेलं मुंबईतलं वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी राणीची बाग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतू कोविडचा अद्याप न टळलेला धोका लक्षात घेता राणीच्या बागेतील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्राणी संग्रहालयातील तिकीट खिडकी संध्याकाळी सव्वा पाच ऐवजी ४ वाजता बंद होणार आहे. दिवसभरात किंवा सुट्टीच्या दिवशी कोणत्याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्ये जास्त प्रमाणात गर्दी झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कोविड सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.
कोविड-१९ च्या काळात नागरिकांनी घ्यावयाची दक्षता –
१) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, तिकिट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल.