Mumbai: मानवी रक्ताला चटावलेला बिबट्या, महिलेवर भयंकर हल्ला (VIDEO)
मुंबई: माणसाच्या रक्ताला चटावलेल्या एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव येथील आरे परिसरात एका मध्यमवयीन महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. याच हल्ल्याचा अतिशय धक्कादायक व्हीडिओ आता समोर आला आहे. महिला आणि बिबट्यामधील झटापटीचा हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. ज्यात बिबट्याने मध्यमवयीन महिलेवर अचानक मागून हल्ला केला. पण महिलेने आपल्या हातातील काठीने बिबट्याचा हल्ला परतवून लागला. ज्यामुळे बिबट्याने […]
ADVERTISEMENT

मुंबई: माणसाच्या रक्ताला चटावलेल्या एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव येथील आरे परिसरात एका मध्यमवयीन महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. याच हल्ल्याचा अतिशय धक्कादायक व्हीडिओ आता समोर आला आहे. महिला आणि बिबट्यामधील झटापटीचा हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.
ज्यात बिबट्याने मध्यमवयीन महिलेवर अचानक मागून हल्ला केला. पण महिलेने आपल्या हातातील काठीने बिबट्याचा हल्ला परतवून लागला. ज्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. दरम्यान, हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ही घटना बुधवारी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
बिबट्याने महिलेवर कशाप्रकारे हल्ला केला हे आपल्याला व्हीडिओमध्ये पाहायला मिळतं आहे. सुरुवातीला महिला काठीच्या मदतीने चालत-चालत घराबाहेर आली आणि मग घराच्याच शेजारी असलेल्या एका ओट्यावर ती बसली. पण तेवढ्यात त्याच बाजूला दबा धरुन बसलेल्या एका बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला.