Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची मतं कुणाला मिळाली? हितेंद्र ठाकूर म्हणाले…
महाराष्ट्रातल्या विधान परिषदेची निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. २८५ आमदारांनी आपला हक्क बजावला. ४ वाजता मतदान संपलं त्यानंतर ५ वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली. महाविकास आघाडीने आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही बाजूंनी आमचेच […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या विधान परिषदेची निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. २८५ आमदारांनी आपला हक्क बजावला. ४ वाजता मतदान संपलं त्यानंतर ५ वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली.
महाविकास आघाडीने आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार निवडून येणार असा दावा करण्यात आला आहे. अशात आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही सुरू झालं आहे.
Deepali Sayed : “राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस…”
बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक निकाल लागल्यानंतर आमची मतं कुणाला मिळाली ते स्पष्ट होईलच. मला आज फक्त काँग्रेसचे नेते भेटले नाहीत. तर भाजपचे नेतेही भेटले, त्यानंतर राष्ट्रवादीचेही नेते भेटले. सगळ्यांनी मला विनंती केली. लोकशाहीनुसार मी मतदानाचा अधिकार बजावला आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.