वर्धा: धक्कादायक… पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर महिला होमगार्डने स्वतःला घेतलं जाळून
सुरेंद्र रामटेके, वर्धा: वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी-मेघे येथील पोलीस कॉटर वसाहतीमध्ये आयसीबी (ICB) ला कार्यरत असलेले पोलीस नवनाथ मुंडे यांच्या घराच्या दरवाज्यासमोर एका महिला होमगार्डने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी (9 जानेवारी) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. पोलीस कॉर्टर्स असलेल्या परिसरातील शरद बिल्डिंगमध्ये हा सगळा […]
ADVERTISEMENT

सुरेंद्र रामटेके, वर्धा: वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी-मेघे येथील पोलीस कॉटर वसाहतीमध्ये आयसीबी (ICB) ला कार्यरत असलेले पोलीस नवनाथ मुंडे यांच्या घराच्या दरवाज्यासमोर एका महिला होमगार्डने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे.
रविवारी (9 जानेवारी) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. पोलीस कॉर्टर्स असलेल्या परिसरातील शरद बिल्डिंगमध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक मिळत आहे.
अचानक इमारतीतील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं दिसल्याने परिसरातील रहिवाशांनी त्या फ्लॅटच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक अनोळखी महिला फ्लॅट क्रमांक F2 च्या दरवाज्यासमोर जळत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.
काही नागरिकांनी तात्काळ आग विझवून महिलेला वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 60 ते 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे.