बाई, बुब्स आणि ब्रा! अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टचं Social Media वर भरभरून स्वागत

बाई, बुब्स आणि ब्रा! अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टचं Social Media वर भरभरून स्वागत
फोटो सौजन्य, फेसबुक पेज, हेमांगी कवी

अभिनेत्री हेमांगी कवीने आत्तापर्यंत विविध सीरियल्स, सिनेमांमधून काम केलं आहे. ती फुलराणी या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे तिच्या एका पोस्टची. बाई, ब्रा आणि बुब्स असं टायटल देऊन हेमांगीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवर, अंतर्वस्त्रांवरून ती वापरायची की नाही यावरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने खणखणीत उत्तर दिलं आहे.

बाई, ब्रा आणि बुब्स नावाच्या पोस्टमध्ये हेमांगी काय म्हणते?

बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो! मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हा त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!

पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं...

ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा) चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रिच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!

आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्यांची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक! Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी! ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं? किती तरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात... 2 2 ब्रा घालतात, nipple area ला tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात... बाप रे!...कशासाठी एवढं आणि का? किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच 'लोग क्या कहेंगे' लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो! स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी 'काढण्याची मुभा' दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कशासाठी यार! बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो problem त्या पुरुषांचा आहे!

फोटो
फोटो फेसबुक पेज, हेमांगी कवी

हेमांगी कवीने लिहिलेल्या या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. हेमांगीने मांडलेली मतं आणि तिची भूमिका योग्यच आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेता प्रवीण तरडे म्हणतो, विचार म्हणून खतरनाक.. लेखन म्हणून वरचा दर्जा. साहित्य म्हणून कालातीत तू लढ हेमांगी. अशी कमेंट करून प्रवीण तरडे यांनी हेमांगीला पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री वीणा जामकर म्हणते, क्या बात हेमांगी.. सॉलिड, लय भारी वाचून सुद्धा हायसं वाटलं गं.. Wow Love You

अभिनेता समीर चौगुले म्हणतो, Hats Off Very Proud Of you Hemu... More Power to You

फोटो
फोटो फेसबुक पेज, हेमांगी कवी

या कलाकारांसह नेटकऱ्यांनीही अभिनेत्री हेमांगी कवीच्या या पोस्टचं स्वागतच केलं आहे. हेमांगी कवीने सोमवारी लिहिलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे विविध फोटो आणि व्हीडिओज सोशल मीडियावर पोस्ट करत असतेच. आता या पोस्टने तिची आणखी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in