रतन टाटा 'देवमाणूस'; 'पॉलचा लाडका'कडून मनाला भिडणारा सॅल्यूट

Published on
गणेशोत्सव म्हटलं की, ढोल ताशांचा गजर, आरती निनाद आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आलाच. गणेशोत्सवात आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे देखावे.

गणपती मित्र मंडळांकडून वेगवेगळ्या विषयावरील देखावे सादर केले जातात. पॉलचा लाडका मंडळाने यंदा बाप्पाच्या सजावटीतून उद्योगपती रतन टाटांच्या कार्याला सॅल्यूट केलाय.

रतन टाटा यांचं वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतः कर्करोग उपचारासाठीचं योगदान बघून पॉलचा लाडका मंडळाने त्यांच्या कार्याला अभिवादन केलंय.

या संकल्पनेविषयी पॉलचा लाडका मंडळानं म्हटलं की, 'कर्करोग, हा शब्द ऐकताच बरेच लोक अस्वस्थ होतात. हा रोग नुसता भारतातच नव्हे तर जगभरात बऱ्याच लोकांच्या मृत्यूचा कारण आहे. कॅन्सर रजिस्ट्री सोसायटीच्या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी तब्बल ८ लाख नवीन कर्क रुग्णांची वाढ होत आहे.'

'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि याच शहरात आहे कर्करोगावर आरोग्य सेवा पुरवणारं देशातले अव्वल असे टाटा कॅन्सर रुग्णालय.'

 'भोईवाडा परळ या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना हे रुग्णालय चांगलंच माहिती आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं एकदा तरी हे रुग्णालय पाहिलेलं किंवा त्याबद्दल ऐकलेलं आहे, परंतु जी गोष्ट सगळ्यांना अस्वस्थ करते ती म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर असलेले रुग्ण ज्यांना साधनांच्या अभावी रस्त्यावर राहावं लागतं.'

'प्रत्येकाला वाटतं यांच्यासाठी काहीतरी करावं, पण मग पर्याय शोधता शोधता या विषयाचं महत्त्व आपल्याकडून दुर्लक्ष होतं आणि आपण आपल्या आयुष्यात पुन्हा गुंतून जातो.'

'यावेळी आम्ही ठरवलं आमच्या गणेशोत्सवाच्या केंद्रस्थानी त्यांचाच विषय असेल. ते लोक आहेत तरी कोण? काही जणांना ते रुग्ण वाटतात काही जणांना ते गरजू, पण ते खऱ्या अर्थाने लढवय्ये आहेत.'

'ते नुसतं एका रोगाशी लढत नाहीयेत तर त्या रोगासोबत येणारा प्रचंड मानसिक ताण, आर्थिक तंगी आणि सहानुभूतीचा अभाव या सर्वांशी लढतायेत. त्यांच्यासोबत या लढाईत उभे आहेत रुग्णालय कर्मचारी आणि इतर संस्था', असं मंडळाने या संकल्पनेबद्दल म्हटलं आहे.

रतन टाटा यांना एक छोटसं अभिवादन म्हणून गणेशोत्सवाच्या एकोणतीसाव्या वर्षात पदार्पण करताना 'पॉलचा लाडका'च्या माध्यमातून 'टाटा कॅन्सर रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर' याची एक प्रतिकृती तयार केली गेलेली आहे.

'आपल्या गणेशोत्सवाच्या केंद्रस्थानी कर्क रुग्णांची कहाणी' अशी या संकल्पनेची कथा आहे. ही संकल्पना/DOP फ्रँक्लीन पॉल यांची आहे. लिखाण प्रियेश त्रिपाठी यांनी केलंय. मूर्तिकार उदय राजेंद्र गोटावले असून, कला दिग्दर्शन ( कलाकार) सूनित अजगेकर यांनी केलंय. व्यवस्थापन दिपक सावंत यांचं असून, कारपेंटर दिनेश परशुराम मेस्त्री यांनी काम केलंय. इलेक्ट्रिशियन हमीद भाई असरे, तर छायाचित्रण आझाद जाधव, निमिष दळवी यांनी केलं आहे. संकलन पॉल आणि सावंत मित्र परिवाराने केलं आहे.

Mumbai Tak
www.mumbaitak.in