निर्जन रस्ते, भयाण शांतता...पाहा दंगलीनंतरच अमरावती शहर

अमरावतीत तणावपूर्ण शांतता, इंटरनेट सेवा बंद
निर्जन रस्ते, भयाण शांतता...पाहा दंगलीनंतरच अमरावती शहर
फोटो सौजन्य - समीर शानबाग
Published on
सर्व फोटो सौजन्य - समीर शानबाग

त्रिपुरातील मशिदीच्या कथित विटंबन प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या दंगलीनंतर आता भयाण शांतता पसरली आहे.

त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लीम समाजाने पुकारलेला बंद आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप आणि हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. ज्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरात कलम १४४ लागू केलं आहे.

संचारबंदीमुळे अमरावती शहराच्या रस्त्यांवर भयाण शांतता पसरलेली असून एरवी गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते अशा पद्धतीने निर्मनुष्य झालेले पहायला मिळाले.

दोन दिवसांमध्ये झालेल्या दंगलीत दोन्ही बाजूच्या गटांनी शहरात जोरदार तोडफोड करत जाळपोळ केली आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं. त्यामुळे अमरावती शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर आता पोलिसांनी असा कडेकोट बंदोबस्त केला आहे.

शहरातील प्रमुख बाजारपेठेसह नागरि वसाहतींमध्ये आज शांतता पहायला मिळाली.

सध्या शहरातली परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येत असली तरीही हा बंद दरवाजा गेले दोन दिवस शहरातील तणावाचं वातावरण सांगण्यासाठी पुरेसा आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in