रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत आल्यापासून काय काय घडलं?

रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत आल्यापासून काय काय घडलं?
Published on

अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा या दोघांनी मुंबईत येऊन हनुमान चालीसा म्हणणार हे जाहीर केलं होतं. त्यांना अमरावतीतच अडवण्याची तयारी झाली होती. मात्र हे दोघेही आज मुंबईत दाखल झाले आणि शिवसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली

नवनीत आणि रवी राणा यांना शोधण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईत झाडाझडती सुरू केली

रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईतल्या गेस्ट हाऊसमध्ये उतरल्याचं कळलं तिथे शिवसैनिकांची गर्दी झाली होती

रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही खार या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी त्यांना तिथे जाऊन १४९ ची नोटीस बजावली

हिंमत असेल तर मुंबईत येऊन दाखवा असं आव्हानही नवनीत राणा आणि रवी राणा यांना देण्यात आलं होतं.

रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत आल्याचं कळताच शिवसैनिकांनी मातोश्रीच्या बाहेर गर्दी केली होती

काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्या मातोश्रीच्या समोर शांततेच्या मार्गाने हनुमान चालीसा पठण करणार आहोत असं नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही जाहीर केलं.

एका कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे.
एका कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे.Photo/IndiaToday

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा आणि हिंदुत्व दोन्ही विसरले आहेत अशीही टीका यावेळी राणा दाम्पत्याने केली.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in