Sada Sarvankar : “अटक सोडा, गद्दारीचं बक्षीस दिलं”; आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले
सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
ADVERTISEMENT

Sada Sarvankar Aaditya Thackeray : मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शिंदे सरकारने आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त होते. दरम्यान, या नियुक्तीवरून आमदार आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर संताप व्यक्त केला.
आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्याने सरकार त्यांना मुदतवाढ देणार की नव्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवणार? असा प्रश्न चर्चिला जात होता. दरम्यान, सरकारने माहीमचे आमदार सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
आदित्य ठाकरेंची शिंदे सरकार तोफ
सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय. यात त्यांनी सदा सरवणकर वादात सापडले त्या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.
“दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले”, असं टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी डागलं आहे.