NCP : ”दादा, दादा करत तुमचं…”, अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं

प्रशांत गोमाणे

83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

ADVERTISEMENT

ajit pawar mp sunit tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision
ajit pawar mp sunit tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision
social share
google news

Sunil Tatkare Criticize Supriya Sule, NCP crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दाखल झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च अपयश झाकण्यासाठी आणि नैराश्यापोटी दुसऱ्यावरती असे आरोप करत असल्याची टीका सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.  (ajit pawar mp sunil tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision)

सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना मणिपूर हिंसाचारात अविश्वास ठरावाच्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांनी सरकाराच्या बाजूने मतदान केल्याचं म्हटलं होतं. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खरमरीत टीका केली.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला.. 17 वर्षीय मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार, नंतर..

आदरणीय दादांनी 30 वर्षात बारामती उभी केली. दादा, दादा, दादा बोलता बोलता ज्यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. तसेच दादांविरूद्ध याचिका दाखल करताना, मग मात्र सांगणार की राजकीय विचारधारा वेगळी असल्यामुळे आम्ही ते तशापद्धतीने केल्याचे तटकरे यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पाटील यांच्या वयावर आक्षेप घेतला होता. श्रीनिवास पाटील यांच्याबाबत मला कमालिचा आदर आहे. माझे अनेक वर्षाचे त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत. आम्हाला सर्वांनाच ते पितृतुल्य आहे. राजकीय लढाई होत असते त्यावेळेस वयोमर्यादा हा काय विषय येत नसतो. तसेच मला इतकंच म्हणायचय की, 83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp