‘BJP ने सोमय्यांचा बळी दिला’, आक्षेपार्ह Video वर सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News Marathi: मुंबई: भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (Offensive Video) समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ चॅट समोर आले आहेत. या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांच्या अद्याप प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. (alleged offensive video bjp leader kirit somaiya thackeray group leader bjp has sacrificed sushma andhare made serious allegations maharashtra political news in marathi)
किरीट सोमय्या यांच्या याच वृत्तानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ट्विट करत हा व्हिडीओ समोर येण्यामागे भाजपलाच लक्ष्य केलं आहे. अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपनेच किरीट सोमय्यांचा बळी दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
‘…म्हणून भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय’
अंधारे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमय्याचा व्हिडीओ आत्ताच का यावा? महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय.’ असं ट्वीट करत सुषमा अंधारेंनी या सगळ्या प्रकरणात भाजपला टार्गेट केलं आहे.
भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा?
महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी,
या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय. @ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) July 17, 2023