Anil Deshmukh : “अजित पवार-प्रफुल पटेल म्हणाले, ‘पाहिजे ते मंत्रिपद देतो”
Anil Deshmukh on Ajit Pawar-Praful Patel : भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला मंत्रिपदाची ऑफर दिली. प्रफुल पटेलांनी चार कॉल केले होते, असे देशमुख म्हणाले.
ADVERTISEMENT

-विकास राजूरकर, चंद्रपूर
Anil Deshmukh News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हाड देत अजित पवारांनी बंडाचं निशाण फडकावलं. पक्षातील काही नेत्यांना आणि आमदारांसोबत घेत भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) मेळाव्यात अनेक गौप्यस्फोट केले. पण, त्यानंतर माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेलांचं नाव घेऊन राजकीय बॉम्ब फोडला.
‘अजित पवार आज जे काही सांगत आहेत, त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले? कर्जत येथे अजित पवारांनी जी काही वक्तव्य केली आहेत, ती चुकीची आहेत’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) निर्धार मेळावा कर्जतमध्ये पार पडला. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह अजित पवारांनी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी उघड करत शरद पवारांना घेरले. या कार्यक्रमातील अजित पवारांच्या विधानांवर बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.