Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’
आम्हालाही भाजपमूक्त राम करावा लागेल, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली होती. या टीकेवर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी तुम्ही काय ही ओवेसीची सुपारी घेतलीये का? असा खरमरीत सवाल ठाकरेंना केला आहे.
ADVERTISEMENT

Ashish shelar Criticize Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता.प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तसं तुम्ही करत असाल तर आम्हालाही भाजपमूक्त राम करावा लागेल, अशी टीका ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर केली होती. या टीकेवर आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी तुम्ही काय ही ओवेसीची सुपारी घेतलीये का? असा खरमरीत सवाल ठाकरेंना केला आहे. (ashish shelar reply uddhav thackeray on ram mandir nashiv state adhiveshan maharashtra politics)
आशिष शेलांची पोस्ट जशीच्या तशी
छान झाले, दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली!!
◆ गोदातीरी उभं राहून श्रीमान उध्दव ठाकरे यांनी वल्गना केली की, भाजपाला राम मुक्त करायये आहे.
◆ तुम्ही काय ही ओवेसीची सुपारी घेतलीये का?
◆ भारतीय मनातून राम वेगळा काढायला ओवेसीच्या बापाला तरी जमेल काय?
◆ भाजपाचे बाप म्हणून वंदनीय शामाप्रसाद मुखर्जी यांनी कुणाशी युती केली त्याचा जाब आम्हाला विचारताय?
हे ही वाचा : ‘लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो…’, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
◆ आमचा सवाल तुम्हाला आहे की, शिवसेना स्थापन करणाऱ्या
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही काय केलेत?
◆ सख्या भावासह चुलत भावालाही घराबाहेर बाहेर काढणाऱ्या श्रीमान उद्धव ठाकरे यांना रामायणातील
वाली, सुग्रीव अशी बरीच पात्र आठवतात.. मग पादूका सिंहासनावर ठेवून राज्य करणारा भरत तुम्हाला का आठवत नाही?
आणि हो..
कविवर्य सुरेश भटांची जी कविता तुम्ही आज ऐकवलीत त्याच कवितेतील पुढची ओळ तुमच्या सारख्या वाचाळवीरांसाठी आहे ती अशी…
छान झाले, दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली
यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !
*छान झाले, दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली!!*
◆ गोदातीरी उभं राहून श्रीमान उध्दव ठाकरे यांनी वल्गना केली की, भाजपाला राम मुक्त करायये आहे.
◆ तुम्ही काय ही ओवेसीची सुपारी घेतलीये का?
◆ भारतीय मनातून राम वेगळा काढायला ओवेसीच्या बापाला तरी जमेल काय?
◆ भाजपाचे बाप म्हणून…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 23, 2024
ठाकरे काय म्हणाले?
आजचे पंतप्रधान म्हणजे आमचे शिवाजी महाराज अजिबात नाही. जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर आज राममंदिर उभं राहु शकलं नसत, असे ठाकरेंने मंगळवारी ठणकावून सांगितलं होते. तसेच आज प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तसं तुम्ही करत असाल तर आम्हालाही भाजपमूक्त राम करावा लागेल. नुसत जय श्री राम नाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, असा हल्ला ठाकरेंनी भाजपवर केला होता.
हे ही वाचा : Govindgiri: ‘मी मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली नाही, फक्त..’, गोविंदगिरी महाराजांचा यू-टर्न
वालिचा वध का केला, आपल्याला सुद्धा वालीचा वध करावा लागेल. कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली. ज्यांनी भगव्याशी प्रतारणा केली आणि हक्काची शिवसेना पळवली, त्यांचा कुणीही वाली असेल त्यांचा वध केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला होता. तसेच राम की बात हो गयी अब काम की बात करेंगे. तुम्ही 10 वर्षात का गेले ते सांगा,असेही आव्हान ठाकरेंनी भाजपला दिले होते.