Miraj : ‘ती’ कृती चुकीचीच! ‘भाजप पडळकरांना पाठीशी घालणार नाही’
मिरज : शहरात रातोरात केलेली पाडापाडीची कृती चुकीचीच होती. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या कोणालाही भाजप पाठीशी घालत नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशा शब्दात भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप नेते, जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांना फटकारलं आहे. ते सांगलीत बोलतं होते. ब्रम्हानंद पडळकर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू […]
ADVERTISEMENT

मिरज : शहरात रातोरात केलेली पाडापाडीची कृती चुकीचीच होती. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या कोणालाही भाजप पाठीशी घालत नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशा शब्दात भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप नेते, जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांना फटकारलं आहे. ते सांगलीत बोलतं होते. ब्रम्हानंद पडळकर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू
सुरेश खाडे म्हणाले, पडळकर यांनी मिरजेत केलेली कृती योग्य नाही. ती दुर्दैवी स्वरूपाची आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना भाजप कधीही पाठीशी घालत नाही आणि घालणार नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील. तसंच या पाडापाडी बाबत पोलीसही योग्य कारवाई करतील, असं आश्वासन देखील पालकमंत्री खाडे यांनी यावेळी दिले. शिवाय जागेचा ताबा हा कायदेशीर मार्गानेही घेता आला असता, मात्र दुर्देवी स्वरुपाची कृती झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं होतं?
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रस्त्याला लागून असलेले दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर्स, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा दहा मिळकती शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आल्या. यासाठी मध्यरात्री पोकलेनच्या सहाय्याने शेकडो लोकांचा जमाव घेऊन ब्रम्हानंद पडळकर हे आले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.