Chhagan Bhujbal: बारामतीत यु टर्न ते तेलगी प्रकरण, छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

chhagan bhujbal question to sharad pawar ajit pawar beed rally maharashtra politics
chhagan bhujbal question to sharad pawar ajit pawar beed rally maharashtra politics
social share
google news

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बीडमध्ये सभा पार पडली. या सभेत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या अनेक निर्णयावर सवाल उपस्थित केले.यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे अजित पवारांना अजूनही आमचे नेते म्हणतात. मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा आणि आशीर्वाद देऊन वाद मिटवा असे आवाहन छगन मुजबळ यांनी शरद पवारांना केले आहे. (changan bhujbal question to sharad pawar ajit pawar beed rally maharashtra politics)

राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? पक्ष कुणाकडे आहे? असा भाषणाचा सुरुवातीलाच सवाल करत छगन भुजबळ म्हणाले, हा सगळा महासागर पाहून स्पष्ट होते की , हा राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा आहे आणि अध्यक्ष अजित दादाच आहे, असे विधान करून छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

हे ही वाचा : Dhananjay Munde: अजितदादांसमोरच धनंजय मुंडेचा थेट सवाल, ‘शरद पवारांनी बीड जिल्ह्याला…,’

छगन भुजबळ पुढे म्हणाले, शरद पवार माझा मतदारसंघ येवला ते बीड ते कोल्हापूर अशी रॅली काढतात, मात्र बारामतीला पोहोचल्यावर यू-टर्न घेतात.आणि अजित पवार अजूनही आमचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणणार, शरद पवार म्हणणार तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा, आशीर्वाद देऊन वाद मिटवा असे आावहन छगन भुजबळ यांनी केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार यांनीच प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील यांना दिल्लीला नेले आणि मंत्रिपद, जागावाटपाची सूत्रे आणि 2014 पासून अनेक कामांसाठी वाटाघाटी केल्या. त्या यादीत माझं नाव नव्हतं मग आमचं काय चुकलं? असा दुटप्पीपणा का खेळताय? तुम्ही दाखवलेला मार्ग आम्ही चाललो तर आमचं चूकलं काय?, असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी शरद पवारांना केला.

माझ्यावर तेलगी घोटाळ्यात आरोप झाल्यावर तुम्ही माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतलात. हे निराधार आरोप असूनही मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पण 1992-93 मध्ये तुमच्यावर गंभीर आरोप झाले,तेव्हा तुम्हाला कोणीही राजीनामा द्यायला सांगितले नाही आणि राजीनामाही दिला नाही, असे देखील भुजबळ म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Raj Thackeray : ‘कुंपणच शेत खातंय’, राज ठाकरेंनी कोकणवासीयांसमोर मांडलं जमिनींच गणित

    follow whatsapp

    ADVERTISEMENT