Chhagan Bhujbal नी शिंदे सरकारविरोधात थोपटले दंड! ओबीसींना हाक, केली मोठी घोषणा

ऋत्विक भालेकर

शिंदे सरकारने नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याविरोधात छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी भूमिका घेतली आहे. नेमकी भूमिका काय?

ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal will protest against shinde government decision.
Chhagan Bhujbal will protest against shinde government decision.
social share
google news

Chhagan Bhujbal OBC Reservation : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या संदर्भाने सुरू असलेल्या हालचालीविरोधात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतल्यानंतर मोठी घोषणा केली. भुजबळांनी ओबीसी समाजाला एकजुटीची हाक दिली असून, महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढणार असल्याचे सांगितले.

सरकारने सगेसोयरे शब्दासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. यावर हरकती मागवल्या. त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. यावर पहिली प्रतिक्रिया आली ती छगन भुजबळ यांच्याकडून. छगन भुजबळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिकेची सातत्याने चर्चा होत आलीये. पण, आता भुजबळांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

छगन भुजबळांची भूमिका काय?

आपल्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय, हे त्यांनी केलेल्या एका पोस्टवरून लक्षात येईल. छगन भुजबळ यांनी २८ जानेवारी रोजी झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर वेगळी भूमिका जाहीर केली.

भुजबळांनी म्हटलं आहे की, “तमाम ओबीसी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी गट तट सोडून सर्व ३७४ जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp