अजित पवारांच्या भूमिकेला छत्रपती संभाजीराजेंचा विरोध, वादावर म्हणाले..

chhatrapati sambhajiraje : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर उल्लेख चुकीचा असल्याचं अजित पवार म्हणाले. त्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून, यात छत्रपती संभाजीराजेंनीही उडी घेतलीये.
Chhatrapati sambhajiraje opposed ajit pawar statement
Chhatrapati sambhajiraje opposed ajit pawar statement

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल करण्यात आलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजप आक्रमक झालीये. याच मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी अजित पवारांना सुनावलं आहे.

राज्यात सुरू झालेल्या नव्या राजकीय वादावर छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केलीये. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्याचं संरक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणीसाहेब यांनी केलं यात काहीही दुमत नाही."

"छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत, हे निश्चित आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षण केलं. हे कुणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेतच, त्याचबरोबर धर्मरक्षकही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही", अशी असं संभाजीराजे म्हणाले.

Chhatrapati sambhajiraje opposed ajit pawar statement
अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी
"मी जिथे जिथे भाषण करतो, त्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन करतो. संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर म्हणूनच केलाय, यापुढेही तेच राहिल. पण, महाराष्ट्रात आज जो वाद सुरूये. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितलं की, संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. अनेक पुरावे आहेत, ज्यात संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक आहेत, धर्मवीर आहेत", अशी भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आहे.
Chhatrapati sambhajiraje opposed ajit pawar statement
भाजपच्या मिशनमुळे शिंदेंचं वाढलं टेन्शन! जेपी नड्डांची बालेकिल्ल्यात सभा

अजित पवारांचं विधान : छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

छत्रपती संभाजीराजेंनी अजित पवारांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "अजित पवारांनी कुठला संदर्भ घेऊन हे विधान केलंय, हे त्यांनीच सांगावं. माझी त्यांना सूचना आहे की, कुठलीही ऐतिहासिक घटना बोलायची असेल, तर त्याचा अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी जे विधान केलंय, ते चुकीचं आहे. अजित पवार अर्धसत्य बोलले आहेत. ते स्वराज्यरक्षक बोलले हे बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे", असं संभाजीराजे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in