‘आमचे पोस्टर फाडले ना, आता आम्ही तुमची मस्ती फाडतो…’ फक्त निवडणुका येऊ दे…’

मुंबई तक

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आज पुन्हा एकदा आमने सामने आले.मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर हा वाद टोकाला जात काही क्षणातच उद्धव ठाकरे यांनी मुब्र्यात दाखल होत शिंदे गटाला थेट इशाारा देत पोलीस बाजूला ठेवून तुम्ही आमच्या समोर असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde encroachment Shiv Sena branch in Mumbra over which Thackeray-Shinde
Chief Minister Eknath Shinde encroachment Shiv Sena branch in Mumbra over which Thackeray-Shinde
social share
google news

Uddhav Thackeary: उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या बालेकिल्ल्यात जात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेची शाखा पाडल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. त्यावरुन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शाखा पाडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी काही क्षणात रवाना होत मुंब्रा शाखेची (Mumbra Shivsena Shakha Branch) पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अडवणूक करत त्यांना पाडलेल्या शाखेकडे न जाण्याची विनंती केली मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी शाखेकडे जात पोलीस बंदोबस्तातच त्यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत आमचे पोस्टर फाडले ना, आता आम्ही तुमची मस्ती फाडतो, फक्त निवडणुका येऊ दे असा थेट इशाराच त्यांनी शिंदे गटाला दिला आहे. त्यामुळे या शाखेवरुन वाद आणखी चिघळणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

अतिक्रमण केलेला तो खोका हटवा…

मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर ठाण्यासह मुंब्र्यात हायहोल्टेज ड्रामा घडला आहे. पोलिसांनी खोके सरकारला संरक्षण देत शिवसेनेच्या शाखा पाडू दिल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला आहे. यावेळी ज्या शाखेवर शिंदे गटाने आक्रमण केले आहे, त्यांना थेट इशाराच दिला आहे. अतिक्रमण केलेला तो खोका हटवा नाही तर आम्ही तो उचलू म्हणत शिंदे गटाला त्यांनी आगामी निवडणुकीतही इशारा दिला आहे.

 महाराष्ट्राची अब्रू गेली असती

ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने अतिक्रमण करुन शिंदे गटाने त्यावर दावा केला. त्यामुळे हा वाद टोकाला गेला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या शाखेवर अतिक्रमण करुन शाखा ताब्यात घेतल्याने उद्धव ठाकरे यांनी काही वेळेतच मुंब्र्यात दाखल होत शिंदे गटाला ठणकावून सांगितले. यावेळी ते म्हणाले की, जर या शाखेवर मुंब्र्यात काही घडलं असतं तर आज महाराष्ट्राची अब्रू गेली असती अशी भावनाही त्यांनी यावेली व्यक्त केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp