Devendra fadnavis : 'राहुलजी, काल तुम्ही सांगितलं होतं, आज मी तुम्हाला काही कागदपत्रं वाचायला देतो'

Devendra Fadnavis Vs Rahul Gandh on veer Savarkar : देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दाखवले ऐतिहासिक दस्ताऐवज
veer Savarkar : Devendra Fadnavis And Rahul Gandhi
veer Savarkar : Devendra Fadnavis And Rahul Gandhi

वीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी अंदमानच्या तुरूंगात असताना माफीनामा लिहिला असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. भाजप-मनसे आक्रमक झालीये. तर शिवसेनेनं काहीसं अंतर राखत या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. राहुल गांधींनी सावरकरांची पिटिशन दाखवली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना कागदपत्रे पोस्ट करत वाचण्याचा सल्ला दिलाय.

वीर सावरकर वाद : देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना उत्तर

देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर काही कागदपत्रं शेअर केलीत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, "राहुलजी, काल तुम्ही मला एका पत्रातील अखरेच्या ओळी वाचायला सांगितल्या होत्या. ठिके, आता मी काही दस्ताऐवज तुम्हाला वाचायला देतो. आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय असलेल्या महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचलं का? तशाच अखेरच्या ओळी यात आहेत का? ज्या तुम्ही मला वाचायला सांगत होतात."

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणतात, "आता भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (तुमची आजी) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काय म्हटलं होतं, तेही जरा वाचा... यात त्यांनी म्हटलं होतं की, सावरकर स्वातंत्र्य आंदोलनाचे आधारस्तंभ आणि भारताला सदैव आठवत राहतील असे सुपूत्र आहे, असं त्या म्हणतात", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींना दाखवला शरद पवारांचा व्हिडीओ...

या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय. "महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचं स्वतःचं एक खास स्थान आहे, ते शरद पवार वीर सावरकर यांच्याबद्दल काय म्हणत आहेत? जरा तेही वाचा, ऐका. याच पत्रात ते दोन आजन्म कारावासांचा उल्लेख करतात", असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय.

फडणवीसांनी राहुल गांधींना दिला पी.व्ही. नरसिंहरावांचा दाखला

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात, "काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी होते. सामाजिक सुधारणांसाठीची त्याची कटिबद्धता, आजच्या पिढीसाठी शिकवण देणारी आहे. ते काय म्हणतात तेही वाचा."

"आम्ही महाराष्ट्रातून आहोत, त्यामुळे काँग्रेसचे भूतकाळातील नेते आणि माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई काय म्हणतात, तेही वाचा. 'स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांची देशभक्ती, त्यांचा असीम त्याग यामुळे त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात सन्मानाची भावना आहे. त्याशिवाय दुसरी भावना असणं अशक्य आहे, असा दाखल देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

श्रीपाद अमृत डांगेंची विधानाचाही उल्लेख

फडणवीस ट्विटमध्ये म्हणतात, "फक्त काँग्रेसचं नाही,तर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगेंनी म्हटलं होतं की, 'वीर सावरकर आद्य क्रांतिकारक होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात झाली होती."

वीर सावरकर वाद : देवेंद्र फडणवीसांनी यशवंतराव चव्हाणांच्या विधानाचा केला उल्लेख

फडणवीस म्हणाले, "देशाचे माजी संरक्षणमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणतात, 'वीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट घेतले. (हे पत्र त्यांनी वीर सावरकर यांचे सुपुत्र विश्वास सावरकर यांना पाठवलं होतं.)"

स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली अर्पण करताना इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, 'धाडस आणि देशभक्तीसाठीचा प्रतिशब्द म्हणजे सावरकर आहेत.' तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की, 'स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरजी यांनी अनेक मार्ग स्वीकारले. त्यांचं चरित्र नव्या पिढींसाठी सदैव मार्गदर्शन करत राहिल.'

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

या ट्विटच्या शेवटी फडणवीसांनी प्रश्नही उपस्थित केलाय. "आता असा प्रश्न उपस्थित होतो की वारंवार वीर सावरकरजींच्या बद्दल विधान करून तुम्ही केवळ तुमच्या व्होट बँकेची चिंता करत आहात का? खरंतर याची जितकी निंदा करावी, तितकी कमीच आहे. देश नेहमीच तुम्हाला विचारत आहे की, आणि असं ठराविक गोष्टी वाचत राहिलात, तर देश, अनेक पिढ्यांपर्यंत हा प्रश्न विचारत राहिल की, अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?", असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in