फासावर लटकवणार का? जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट, तरुणाईला हाक
मराठी रॅपर उमेश खाडे आणि त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती देत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT

‘आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा’, असं संतप्त विधान केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. उमेश खाडे आणि त्याच्या आईवडिलांना अटक केल्याची माहिती देत आव्हाडांनी सरकारवर टीकेचा प्रहार केला.
‘चोर आले, पन्नास खोके घेऊन चोर आले’, या रॅप साँगमुळे राज मुंगासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका कलाकाराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
‘उमेश खाडेला लगेच सोडा’, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, “भोंगळी हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरिबीवर तो या गाण्यामध्ये व्यथित होऊन बोलला आहे.”
आव्हाड म्हणतात, “आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा. अशा किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अशा प्रकारे दाबू शकत नाही.”