Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?
किरीट सोमय्या यांच्या समोर आलेल्या व्हिडीओचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आठ तासांच्या क्लिप्स असल्याचा दावा करत एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या सभापतींकडे सुपूर्द केला.
ADVERTISEMENT

Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या यांच्या समोर आलेल्या व्हिडीओचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आठ तासांच्या क्लिप्स असल्याचा दावा करत एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या सभापतींकडे सुपूर्द केला. त्यानंतर शिवसेनेचे (युबीटी) आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्यांबरोबरच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवरही हल्ला चढवला.
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर अनिल परब म्हणाले, “एक अभूतपूर्व परिस्थिती आणि त्याबाबतीतले खालच्या सभागृहात खूप बॉम्ब फुटले. आज हा पेन ड्राईव्ह बॉम्ब वरच्या सभागृहात आलेला आहे. काल (17 जुलै) भाजपच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. अंबादास दानवे यांनी सांगितलं की कुणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामामुळे त्याचं राजकीय उद्ध्वस्त झालं, तर तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखाद्याच्या कुटुंबावर ज्यावेळी प्रसंग येतो, याचे आम्ही त्रस्त आहोत. आम्ही हे अनुभवलंय.”
अडीच वर्षांची भरपाई कोण करणार?
– “एखाद्या माणसावर ज्यावेळी खोटे आरोप होतात… दादा (चंद्रकांत पाटील) तुम्ही पार्टी विथ डिफरन्स लोक बसलेले आहात. तुम्हालाही मुलं बाळं आहेत. जेव्हा तुमच्या मुलांना यंत्रणेसमोर उभं केलं जातं. यंत्रणांचे लोक घाणेरडे प्रश्न विचारतात. आज भुजबळ इथे बसले आहेत. अडीच वर्ष तुरुंगात काढली आहेत. कोर्टाने निदोर्ष सोडलंय नंतर… पण त्या अडीच वर्षांची भरपाई कोण करणार? म्हणून हा प्रश्न चर्चेला येणं गरजेचं आहे.”
वाचा >> Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा
– “हा प्रश्न किरीट सोमय्या किंवा तुमचा-माझा नाहीये. हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणाऱ्या एका माणसाचा आहे. ज्याने आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून तुमच्यापैकी आणि आमच्यापैकी राजकीय कार्यकर्त्याला… इथे आलेले सगळे प्रचंड कष्टाने आले आहेत. कष्ट केले, लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. जेव्हा तुम्ही करिअर करता आणि त्या करिअरवर ज्यावेळी आघात होतो. बदनामी केले जाते. त्या बदनामीची उत्तरं इथेच दिली पाहिजे. म्हणून हे सभागृह आहे. हे सभागृह कशासाठी आहे. न्याय मिळावा म्हणूनच हे सभागृह आहे. कुणाची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये.”










