CBI च्या धाडीनंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह 21 ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी धाडी टाकल्या होत्या. यावर बोलण्यासाठी मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन वादात सापडलेल्या दारू धोरणाचे देशातील सर्वोत्तम धोरण असल्याचे वर्णन केले. ज्या मद्य धोरणावरून हा वाद निर्माण होत आहे, तोच देशातील सर्वोत्तम धोरण आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, […]
ADVERTISEMENT

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह 21 ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी धाडी टाकल्या होत्या. यावर बोलण्यासाठी मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन वादात सापडलेल्या दारू धोरणाचे देशातील सर्वोत्तम धोरण असल्याचे वर्णन केले. ज्या मद्य धोरणावरून हा वाद निर्माण होत आहे, तोच देशातील सर्वोत्तम धोरण आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे देशभरात नाव कमावत आहेत, त्यामुळे हे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते कट्टर प्रामाणिक आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य नीट करून दाखवले.
‘एक-दोन दिवसात मला अटक करू शकतात’- मनिष सिसोदिया
त्यांच्यामुळे आज भारताचे नाव रोशन होत आहे, म्हणून केजरीवाल यांच्या आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांवर छापे टाकले जात आहेत. मी भ्रष्टाचार केला नाही, फक्त मी अरविंद केजरीवाल यांचा शिक्षणमंत्री आहे, असे ते म्हणाले. एक-दोन दिवसांत मला अटक करू शकतात. पंतप्रधानांना ते शोभत नाही. ते म्हणाले- अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक एवढाच आहे की केजरीवाल चांगल्या कामाची प्रशंसा करतात, त्यातून शिकतात आणि मोदीजींना चांगले काम थांबवायचे आहे, असं सिसोदिया म्हणाले.
सूत्रांच्या हवाल्याने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे दावे- सिसोदिया
दिल्ली सरकारच्या दारू धोरणाची योग्य अंमलबजावणी झाली असती तर 10 हजार कोटींचा फायदा झाला असता, असा दावा सिसोदिया यांनी केला. एवढा घोटाळा झाल्याचे मनोज तिवारी आणि एलजी वेगवेगळे आकडे सांगत होते, पण एफआयआरमध्ये ना 8 हजार कोटी, ना 1100 कोटी, ना 144 कोटींचा उल्लेख आहे. एवढेच सूत्रांचे म्हणणे आहे की 1 कोटींचा घोटाळा झाला आहे.