आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना भावनिक पत्र : विकासाकामांमुळे विरोधकांनीही घेतला आहे इंटरेस्ट

आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला तीन वर्ष पूर्ण
Aditya Thackeray
Aditya ThackerayMumbai Tak

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला आज 3 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी यापूर्वी झालेल्या विकासकामाचा आढावा घेतला. तसंच भविष्यातही एकत्र राहण्याचं आणि विकासकाम करत राहण्याचं आश्वासन दिलं.

काय आहे आदित्य ठाकरे यांच्या पत्रात?

प्रिय वरळीकरांनो,

महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+' चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत.

नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत.

म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटतयं.

यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेल. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील. जय हिंद ! जय महाराष्ट्र!

आपला नम्र,

(आदित्य रश्मी उध्दव ठाकरे)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in