आमदार बच्चू कडूंना उस्मानाबाद कोर्टाने ठोठावला पाच हजारांचा दंड, ‘हे’ आहे कारण
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात सुनावणीला हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंट काढले होते त्यात बच्चू कडू हजर झाल्यानंतर कोर्टाने हा दंड सुनावला. तर जामीन रद्द करण्याची तंबी यापुढील सुनावणीला हजर न […]
ADVERTISEMENT

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात सुनावणीला हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंट काढले होते त्यात बच्चू कडू हजर झाल्यानंतर कोर्टाने हा दंड सुनावला.
तर जामीन रद्द करण्याची तंबी
यापुढील सुनावणीला हजर न राहिल्यास थेट जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली तसेच हे प्रकरण कडू हजर न झाल्याने गेली चार वर्षे प्रलंबित असल्याने न्यायाधीश गुप्ता यांनी खडेबोल सुनावले. यापुढे तारखेला वेळेवर हजर राहावे व सहकार्य करावे, अति आवश्यक काम असेल तर वकील मार्फत कळवावे असे सांगितले. कडू यांच्यासह अन्य 3 आरोपीना सुद्धा दंड सुनावला, आंदोलन करण्यात आलं आहे.