MLA Disqualification : निकालाआधी शेलारांनी ठाकरेंना डिवचलं, ‘मर्द म्हणायचं आणि…’
भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. स्वत:ला मर्द म्हणायचं आणि सतत रडत बसायंच, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT

MLA Disqualification Verdict, Ashish shelar Critiicize Udhhav Thackeray : आमदार अपात्रता प्रकरणावर अवघ्या काही तासात निर्णय जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) दुपारी 4 वाजता निकाल वाचनास सुरुवात करणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या निकालाआधी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. स्वत:ला मर्द म्हणायचं आणि सतत रडत बसायंच, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंना डिवचलं आहे.(mla disqualification case rahul narswekar bjp ashish shelar criticize uddhav thackeray and sanjay raut maharashtra politics)
आशिष शेलार यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्वीट करून ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Mla Disqualification : अध्यक्ष काही याचिका फेटाळू शकतात; निकमांनी काय सांगितलं?
आशिष शेलारांचे ट्वीट जशाच्या तसं ट्वीट
◆आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते
◆नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू
◆जुगाड करुन मुख्यमंत्रीपद मिळविले, तरीही रडगाणे सुरूच
◆पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते
◆पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणे कायम होते
◆मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हाही रडणे सुरूच…
◆बरं, भाजपाने देशातील अनेक राज्यं जिंकली तेव्हाही रडतच होते
◆राम मंदिर उभे राहिले, मग निमंत्रण नाही म्हणून रडायला लागले
◆ कुठल्याही निवडणुका लागल्या की, झाली यांची रडायला सुरुवात
आणि हो..
◆ सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा त्यांच्या बाजूने आला, तेव्हाही रडणे सुरुच होते
आणि आज..
◆विधानसभा अध्यक्ष निवाडा देणार असे कळले, तेव्हापासून तर पत्रकार पोपटलाल यांच्यासह प्रत्येकजणाने वेगवेगळे सूर लावून रडायला सुरुवात केली आहे!
‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता,
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।
मन हारकर, मैदान नहीं जीते जाते !
(-श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी)
◆आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते
◆नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू
◆जुगाड करुन मुख्यमंत्रीपद मिळविले, तरीही रडगाणे सुरूच
◆पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते
◆पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणे कायम होते
◆मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हाही रडणे सुरूच……— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 10, 2024
हे ही वाचा : Crime : आधी पार्टी केली नंतर गोळी घातली, उल्हासनगरमध्ये काय घडलं?
मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका
“जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो, ती संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो, मग तो निवडणूक आयोग असेल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केले आहेत. मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल पाहिजे. मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.