MLA Disqualification : ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?
Rahul Shewale Shiv Sena mla disqualification : ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी केली. सुनावणीत कामत यांनी नेमके कोणते प्रश्न विचारले… जाणून घ्या
ADVERTISEMENT

Mla Disqualification latest News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर शनिवारीही (9 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या खासदार राहुल शेवाळींची उलटतपासणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेता पदावरून सवाल करत शिंदेंच्या खासदाराला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यनेता म्हणून निवड केली होती. त्याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारले. त्याचबरोबर भाजप-शिवसेना युतीबद्दलही काही सवाल ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंच्या खासदाराला केले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : राहुल शेवाळेंची उलटतपासणी
देवदत्त कामत : तुमच्या जबाबात पॅरा 5 आणि 6 मध्ये पदाधिकारी महाविकास आघाडीतील घोटाळ्यामुळे नाराज आणि व्यथित झालेले होते, हे खोटे आणि निराधार आहे, हे बरोबर आहे का?
राहुल शेवाळे : नाही, हे चूक आहे.










