NCP: “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण
शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यापर्यंत आता या घडामोडी आल्या असून, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी मुंबई Tak शी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
ADVERTISEMENT

Sharad Pawar resignation meaning : शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यानंतर अशी एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणली. त्यामागच्या कारणाचाही उहापोह सातत्याने राजकीय विश्लेषक, राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांकडून केला जात आहे. दरम्यान, शरद पवारांनी नेमलेल्या अध्यक्ष निवड समितीने त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने नामंजूर केला आहे. समितीतील नेते शरद पवारांची भेट घेणार असून, अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी मनधरणी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. या सगळ्याचा अर्थ काय हेच आपण समजून घेऊयात… (what is meaning of sharad pawar resignation decision?)
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवारांनी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने शरद पवारांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यामुळे आधी समजून घेऊयात की समितीची भूमिका काय आहे?
अध्यक्ष निवड समितीचा ठराव काय?
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी समितीच्या बैठकीनंतर काय सांगितलं, ते आधी बघूयात…
पटेल म्हणाले, “आज समितीने या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर केला आहे. आणि सर्वानुमते आणि मंजूर केला आहे. हा ठराव घेऊन आम्ही शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही आमच्या प्रस्तावाबद्दल त्यांना भेटून विनंती करणार आहोत.”