Manipur Violence: ‘मणिपूर जळतंय अन् मोदी हास्य-विनोद…’, राहुल गांधींचा हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. पाहा राहुल गांधी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi Press Conference: मुंबई: लोकसभेतील (Lok Sabha) अविश्वास प्रस्तावावर (No-Confidence Motion) काल (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अत्यंत दीर्घ असं भाषण केलं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ज्यानंतर आज (11 ऑगस्ट) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदींनी आपल्या भाषणादरम्यान हास्य-विनोद केले, त्यांना मणिपूरबाबत काहीही घेणंदेणं नाही.. अशा स्वरुपाचे अत्यंत गंभीर असे आरोप राहुल गांधींनी यावेळी केले आहेत. (rahul gandhi attacked on pm modi about manipur violence said manipur was burning and modi was laughing in the parliament)
पाहा पत्रकार परिषदेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले:
‘मणिपूर जळत होतं अन् मोदी लोकसभेत हसत होते..’
‘काल पंतप्रधान मोदींनी 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यात शेवटी त्यांनी दोन मिनिटं मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे. लोकं मारली जात आहेत, बलात्कार होत आहे, लहान मुलांना मारलं जात आहे. पण काल पाहिलं असेल की, पंतप्रधान हसून-हसून बोलत होते.. हसत होते. जोक मारत होते.. हे वागणं त्यांना शोभा देत नाही.’
‘जर या देशात हिंसा होत असेल तर भारताचे पंतप्रधानाने दोन तास मजाक उडवता कामा नये. विषय काँग्रेस नव्हता, विषय मी नव्हतो.. विषय हा मणिपूर होता.. मणिपूरमध्ये काय होतंय.. आणि त्याला एकदम का रोखलं जात नाहीए? हा विषय आहे.’
‘मी मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो.. मी आतापर्यंत बोललो नाही.. मला हे आधीच बोलायला हवं होतं. मी 19 झाली राजकारणात आहे. मी आतापर्यंत प्रत्येक राज्यात गेलो आहे. पूर, त्सुनामी, वादळं आली.. हिंसा झाली की, त्या भागात आम्ही जातो. 19 वर्षांच्या अनुभवात जे मी मणिपूरमध्ये पाहिलं आणि ऐकलं ते मी याआधी कधीही ऐकलं नव्हतं. मी संसदेत म्हटलं की, पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भारतमातेची हत्या केली आहे.’