Mla Disqualification : खरी शिवसेना कुणाची, कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर
mla disqualification latest news : राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काय सांगितलं?
ADVERTISEMENT

Rahul Narvekar on Mla Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी 20 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार? याबद्दल माहिती दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदार अपात्रता याचिकांवरील अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. हे प्रकरण आता क्लोज फॉर ऑर्डर झाली आहे. त्यामुळे या संदर्भातील पुरावे सादर केले गेले आहेत. जो युक्तिवाद केला गेला आहे आणि इतर जे कागदपत्र आहेत, त्या सगळ्यांचा तपास करून योग्य निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टाने जी अपेक्षा व्यक्त केली आहे, त्या कालमर्यादेत आम्ही देऊ”, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
निकालाची प्रक्रिया कशी असेल? नार्वेकरांनी दिली माहिती
सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे, याची पुढची प्रक्रिया कशी असेल, असा प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “पक्षांतर बंदीच्या कायद्याचा १०व्या परिशिष्टात उल्लेख आहे. हा कायदा सुधारणा झालेला आहे. त्यात अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. ज्यावेळी दुरुस्ती झाली, त्या वेळी तो कायदा अधिक बळकट आणि सक्षम झाला”, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा >> फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत
“सर्वोच्च न्यायालय असो वा उच्च न्यायालयातही या कायद्यातील अनेक तरतुदींचा अर्थ वेगवेगळ्या वेळी लावला गेला आहे. या यासंदर्भातील याचिकांवर अनेक निर्णय घेतले गेले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा संसदेत, त्यातून काय तयार झाला”, अशी माहिती नार्वेकरांनी दिली.