Raj Thackeray : ‘पुढे काय करायचं उद्या सांगतो’; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, आज हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, राज ठाकरेंनी याबद्दलची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अक्षयतृतीयेच्या दिनी राज्यभर महाआरती करण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, आज हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, राज ठाकरेंनी याबद्दलची भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अक्षयतृतीयेच्या दिनी राज्यभर महाआरती करण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली होती. रविवारी औरंगाबादेत सभा झाल्यानंतर आता मनसेकडून महाआरतीची तयारी सुरू होती. मात्र, आज महाआरती रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

याबद्दल राज ठाकरे यांनी एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. ज्यात सुरुवातीलाच महाराष्ट्र सैनिकांसाठी असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.

“उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.”

हे वाचलं का?

    follow whatsapp