Rajya sabha Election : एमआयएमला कोण देणार प्रस्ताव?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर

मुंबई तक

राज्यात येत्या दहा तारखेला राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपकडून मतांची जुळवाजुळव सुरु असून, एमआयएमची दोन मते कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार रोखण्याठी आघाडीच्या सर्वच आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आहे. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एक मत महत्त्वाचं बनलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात येत्या दहा तारखेला राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपकडून मतांची जुळवाजुळव सुरु असून, एमआयएमची दोन मते कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार रोखण्याठी आघाडीच्या सर्वच आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आहे. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एक मत महत्त्वाचं बनलं आहे.

आता एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ‘भाजपला पराभूत करायचे असेल, तर महाविकास आघाडीने मदत मागावी,’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता एमआयएमकडे प्रस्ताव कोण पाठणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती आहे ते त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवतील, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp