Chief Minister: ‘हो, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं ती चूक का केली?

मुंबई तक

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार पुन्हा येऊ शकत नाही असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे. पण आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

resigned from the post of chief minister uddhav thackeray said why did he make that mistake
resigned from the post of chief minister uddhav thackeray said why did he make that mistake
social share
google news

Supreme Court Maharashtra News: मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अखेर आज (11 मे) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पण हा निर्णय देताना कोर्टाने काही अत्यंत महत्त्वाची निरिक्षणं नोंदवली आहे. त्यातच कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलं की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा न देता ते विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर कोर्टाने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पद बहाल केलं असतं. कोर्टाच्या या निरिक्षणानंतर आता उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची चूक केली नसतं तर निकाल काही वेगळा आला असता असं सर्वत्र बोललं जात आहे. मात्र, आपण ती कायदेशीर चूक का केली हे स्वत: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. (resigned from the post of chief minister uddhav thackeray said why did he make that mistake)

कोर्टाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर एक पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील हजर होते. याच पत्रकार परिषदेत जेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं त्याविषयी ते म्हणाले की, ‘कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर मी दिलेला राजीनामा हे चुकीचं असू शकतं. पण नैतिकता पाहिली तर ज्या लोकांना माझ्या वडिलांनी, माझ्या पक्षाने सगळं काही दिलं तो लोकं माझ्याविरुद्ध माझ्याकडे बोट दाखवत असतील तर त्या लोकांवर मी विश्वास किंवा अविश्वास का दाखवू. त्या लोकांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही.’

‘ज्या लोकांनी माझ्या पक्षाकडून सगळं घेतलं आणि गद्दारी केली.. गद्दार लोकं माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आणि मी त्यांचा सामना करू, हे कसं होऊ शकतं? आज तर कोर्टाने म्हटलं आहे.. कोर्टाने गद्दार म्हटलं नाही पण या सगळ्या गोष्टी आहेतच..’

‘भावनिक होणं हा आमच्या घराण्याचा गुण किंवा दोष असेल पण मी जे आता म्हटलं की, ज्या घराण्याने, पक्षाने ज्यांना सगळं काही दिलं.. आणि सगळं काही घेऊन सुद्धा ज्यांनी माझ्या पाठीत वार केला त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे काही मला पटलेलं नाही. एक तर स्वत: गद्दार.. विश्वासघात त्यांनी केला.. विश्वासघात करणाऱ्यांकडून मला विश्वासदर्शक ठरावाबद्दल विचारलं जात असेल तर ते अयोग्य आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp