पत्राचाळ संजय राऊत सुरूवातीपासून सहभागी, ईडीचा आरोपपत्रात दावा

दिव्येश सिंह

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यात सुरूवातीपासून सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आरोपपत्रात हे म्हटलं आहे की पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रीग केलं आहे. यामध्ये प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यात सुरूवातीपासून सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आरोपपत्रात हे म्हटलं आहे की पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रीग केलं आहे. यामध्ये प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या वतीनेच काम करत होते असंही ईडीने म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

२००६-०७ चा काय आहे संदर्भ?

२००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक माजी मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. यानंतर या प्रकरणात राकेश वाधवानचा सहभाग स्पष्ट झाला. पत्राचाळ डेव्हलपमेंट संदर्भात हा सहभाग होता. ईडीने हे देखील म्हटलं आहे की प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचेच प्रॉक्सी म्हणून काम करत होते. त्यामुळेच त्यांना गुरूआशिष कंपनीत आणण्यात आलं.

संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं, हॉटेल्स बुक करायचे; पत्नीला 55 लाखही पाठवले-ED

हे वाचलं का?

    follow whatsapp