Sharad Pawar : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचं मुंबई प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. शरद पवार म्हणाले, “1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”
पवार पुढे म्हणाले, “तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिलं.”
हेही वाचा >> ‘गद्दारी झाली तेव्हा ठाकरेंना पहिला फोन सोनिया गांधींचा’, म्हणालेल्या तुम्ही…
“गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी, असे सुचवू इच्छितो”, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.










