मोठी ब्रेकिंग : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला! बैठकीत काय झालं?

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी वरिष्ठ नेत्यांची एक समिती नियुक्त केली होती. या समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळण्याचा करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

ADVERTISEMENT

Sharad Pawar resignation as ncp president rejected by committee. what happened in committee meeting?
Sharad Pawar resignation as ncp president rejected by committee. what happened in committee meeting?
social share
google news

Sharad Pawar resignation of ncp president rejected by committee : महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. गेल्या तीन दिवसांपासून राजकारण शरद पवारांभोवती फिरत असून, पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पवारांनी निर्णय बदलण्याचा आग्रह केला. त्यानंतर आज पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून 2 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही शरद पवारांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू असून, महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

शरद पवारांचा राजीनामा नाकारण्याचा प्रस्ताव

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. याच समितीची बैठक आज बोलवली होती. या बैठकीत शरद पवार याचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव एकमताने मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp