नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा 'राष्ट्रवादी'साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट - Mumbai Tak - sharad pawar revealed that pm narendra modi wanted ncp should come with bjp - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट

शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते", असं म्हणत शरद पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
Updated At: May 04, 2023 13:13 PM
sharad pawar revealed in his autobiography lok maze sangati, he said that pm narendra modi wants ncp should come with bjp

लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत शरद पवार यांनी बऱ्याच मुद्द्यांवर भूमिका मांडली असून, काही गौप्यस्फोट केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी नरेंद्र मोदी अनुकूल होते, असा गौप्यस्फोट पवारांनी केला आहे.

2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेना भाजपत दुरावा येण्यास सुरुवात झाली. याच काळात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचा खुलासा अखेर झाला. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात भेटीचा उल्लेख केलेला असून, मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास जास्त अनुकूल होते, असा दावा पवारांनी केला आहे. त्यामुळे नवा मुद्दा समोर आला आहे.

शरद पवार यांनी आत्मचरित्रात अनेक पडद्यामागील राजकीय घटनांचा उलगडा केला असून, नरेंद्र मोदींची भेट घेण्याबद्दलही खुलासा केला आहे.

‘लोक माझे सांगाती’, शरद पवारांनी काय म्हटलंय?

“2019 च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता.”

“राष्ट्रवादीतील नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती”

“मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलोय, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने खमंग राजकीय चर्चा झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती”, असं पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> अवघं राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांच्या राजीनाम्याचे 6 अर्थ

पुढे पवारांनी असंही म्हटलं आहे की, “विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर आमच्या पक्षात विचारविनिमय सुरू असतानाच शिवसेनेचे संजय राऊत यांनी माझी भेट घेतली होती. सत्तेत समान वाट्याचे वचन भाजप पाळण्याबद्दल त्यांना शंका होती. शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याने शिवसेनेत भाजपच्या विरोधात खदखद अधिक वाढली होती.”

भाजपसोबतच्या चर्चांमध्ये माझा सहभाग नव्हता -शरद पवार

“तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रसेच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता. मी या प्रक्रियेत सहभागी नव्हतो”, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.

हेही वाचा >> शरद पवारांचा राजीनामा : ‘सामना’तून पुन्हा अजित पवारांबद्दल शंका, दोन सवाल

“या प्रस्तावावर आमच्या पक्षात विचारविनिमय झाल्यावर भाजपबरोबर जायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. राजकीय संभ्रम राहू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घालायची असेही ठरले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती”, असा खुलासा पवारांनी 2019 मधील त्या भेटीबद्दल केला.

नरेंद्र मोदींना शरद पवारांनी 2019 भेटीवेळी काय सांगितलं होतं?

“आम्ही तुमच्याबरोबर यावे ही अपेक्षा कळत नकळथ व्यक्त होत आहे. परंतू अशी राष्ट्रवादीची कोणत्याही प्रकारे इच्छा नसल्यानेच गैरसमज टाळण्याकरिता मी मुद्दाम भेटीला आलो आहे, असे मी मोदींना स्पष्टपणे सांगितले होते. मोदींनी बारामतीत माझी अनाठायी स्तुती केली होती. तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते”, असं म्हणत शरद पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे.

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात