“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?
Maharashtra Politics News : युती करून वर्ष होण्याआधीच भाजप-शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चित्र राज्यात दिसू लागलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व आलबेल असल्याचे दावे केले जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, अशा मथळ्याखाली देण्यात आलेल्या या जाहिरातीतून थेट देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News : युती करून वर्ष होण्याआधीच भाजप-शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चित्र राज्यात दिसू लागलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व आलबेल असल्याचे दावे केले जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, अशा मथळ्याखाली देण्यात आलेल्या या जाहिरातीतून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला गेला असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटला आहे.
मोदी-शिंदे जोडी… फडणवीस गायब!
शिवसेनेची एक जाहिरात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे.”
पुढे म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.”
हेही वाचा >> Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?
“सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”










