शिवसेना खासदार संजय राऊत तुरूंगात लिहित आहेत पुस्तक, कोर्ट परिसरात दिली माहिती
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. अशात आता संजय राऊत यांनी आपण आपल्या अटकेविषयी पुस्तक लिहित आहोत अशी माहिती कोर्ट परिसरात सूत्रांनी दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक ३१ […]
ADVERTISEMENT

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. अशात आता संजय राऊत यांनी आपण आपल्या अटकेविषयी पुस्तक लिहित आहोत अशी माहिती कोर्ट परिसरात सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक
३१ जुलैला संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. ८ दिवस ईडी कोठडी सुनावल्यानंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. अशात कोर्ट परिसरात संजय राऊत पुस्तक लिहित आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी पुस्तकाबाबत?
माझ्यावर जी केस दाखल करण्यात आली आहे ती पूर्ण केस खोटी आहे.माझा त्या केसशी काहीही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक आणि इतर दोघांना ओळखतो. सच के साथ लढ सकते हैं झुठ के साथ नहीं. त्यामुळे या सगळ्या अनुभवांवर मी एक पुस्तक लिहितो आहे. जेलच्या आत नियमांनुसार वृत्तपत्रं वाचण्यास मिळतात. माझी प्रकृती स्वस्थ आहे अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. आता ५ सप्टेंबरपर्यंत संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही त्यांच्या समोर बसवून चौकशी करण्यात आली. त्यांनाही मनी लाँड्रींग प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं.