parliament special session 2023 : “मोदीजी आहेत, काहीतरी मोठं घडेल”

भागवत हिरेकर

special session of parliament news : अनुराग ठाकूर यांनी विशेष अधिवेशनाआधी मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे काहीतरी मोठे होईल, असे ठाकूर म्हणाले.

ADVERTISEMENT

Union Minister anurag thakur did not reveal the agenda of the special session.
Union Minister anurag thakur did not reveal the agenda of the special session.
social share
google news

Special parliament session agenda : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. हे अधिवेशन कशासाठी बोलवण्यात आले, याबद्दल पूर्ण स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, या अधिवेशनाआधीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी (3 सप्टेंबर) सांगितले की, ‘मुदतीआधी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची सरकारची कोणतीही योजना नाही आणि पंतप्रधान मोदी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भारतातील नागरिकांची सेवा करू इच्छितात. सरकारने ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावर एक समिती स्थापन केली असून, त्यासाठीचे निकष निश्चित करण्यापूर्वी ही समिती व्यापक विचार करेल. आगामी विधानसभा निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांसोबत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही’, असे सांगत ठाकूर यांनी लवकर किंवा उशिरा निवडणुकांबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘अधीर रंजन चौधरी यांना ‘वन नेशन-वन इलेक्शन’ समितीचा भाग बनवण्याची सरकारची इच्छा आहे आणि त्यात विरोधकांचा आवाज समाविष्ट करणे मोदी सरकारच्या मनाचा मोठेपणाच दर्शवते.’ 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी सरकारची मोठी योजना असल्याचे ठाकूर यांनी सूचित केले.

हेही वाचा >> Pratyusha banerjee Suicide : “माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केलीये”

विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विशेष अधिवेशनाचा अजेंडा उघड केला नाही. त्याचबरोबर इंडिया आघाडीने विनाकारण निराश होऊ नये, असा चिमटाही त्यांनी काढला. योग्य वेळ आल्यावर संसदीय कामकाज मंत्री अजेंडा जाहीर करतील, असं सांगताना ठाकूर म्हणाले की, ‘मोदी आहेत, तर काहीतरी मोठं होईल.’

हे वाचलं का?

    follow whatsapp