प्रत्येक भारतीयाला सतावणारा प्रश्न... पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे Army का नव्हती?

मुंबई तक

Many people are now asking why there were no army or police deployed at the place where the terrorist attack took place in Pahalgam.

ADVERTISEMENT

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला तिथे Army का नव्हती?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला तिथे Army का नव्हती?
social share
google news

पहलगाम (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून सोडलं. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यात भारतीय नौदलाचे लेफ्टिनेंट विनय नरवाल, दोन परदेशी पर्यटक आणि अनेक राज्यांमधील नागरिकांचा समावेश आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, या हल्ल्याने सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या आणि संवेदनशील अशा बैसरन व्हॅलीत, जिथे सुमारे दोन हजार पर्यटक उपस्थित होते, तिथे एकही सैनिक, पोलीस किंवा सुरक्षा रक्षक का तैनात नव्हते? या प्रश्नाने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हल्ल्याचं स्वरूप आणि तात्काळ प्रतिसाद

बैसरन व्हॅली, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखलं जातं, ही पहलगाममधील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. हल्ल्याच्या वेळी चार दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनुसार, दहशतवाद्यांनी पीडितांचा धर्म विचारून आणि ओळखपत्र तपासून हिंदूंना लक्ष्य केलं. हल्ला इतका अनपेक्षित आणि क्रूर होता की, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड भीती पसरली. हल्ल्यानंतर काही तासांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि द्रुत प्रतिसाद पथक (क्यूएटी) घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

हे ही वाचा>> 'आमच्या समोर 5 जणांना गोळ्या घातल्या, आम्ही घाबरून अजान म्हटली...', पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार

एक्सवरील अनेक पोस्ट्समध्ये हा मुद्दा तीव्रतेने उपस्थित झाला आहे. एका यूजरने लिहिलं, “पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणी दोन हजारांवर पर्यटक होते, पण सुरक्षेसाठी एकही पोलीस तैनात नव्हता. ही कोणाची चूक?” माजी मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनीही यावर संताप व्यक्त करत सरकारच्या सैन्य कपातीच्या धोरणावर टीका केली आहे.

सुरक्षा यंत्रणांचा अभाव

पहलगाम हा जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील आणि दहशतवादी कारवायांसाठी लक्ष्य ठरलेला भाग आहे. तरीही, या हल्ल्याच्या वेळी बैसरन व्हॅलीत कोणत्याही सुरक्षा यंत्रणेची उपस्थिती नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत

हे वाचलं का?

    follow whatsapp