'आमच्या समोर 5 जणांना गोळ्या घातल्या, आम्ही घाबरून अजान म्हटली...', पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार
पहलगाम दहशतवादी हल्ल्याती प्रत्यक्षदर्शी असलेल्या पुण्यातील आसावरी जगदाळे यांनी नेमकी घटना कशी घडली याबाबतची माहिती सांगितली आहे.
ADVERTISEMENT

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये पुण्याच्या संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही नेमकी घटना कशी घडली आणि त्यावेळी तिथे दहशतवाद्यांनी काय-काय केलं या सगळ्याची माहिती संतोष देशमुखांच्या कुटुंबातील असलेल्या आसावरी जगदाळे यांनी मुंबई Tak शी बोलताना सांगितलं.
'तुम्ही मोदींना डोक्यावर बसवून ठेवलंय..., असं म्हणाले अन् माझ्यासमोर 5 जणांना गोळ्या घातल्या'
आसावरी जगदाळे: आम्ही फिरायला आलो होतो. बैसरन व्हॅली परिसरात.. पूर्ण मोकळा मैदानी परिसर आहे हा. तिथेच दहशतवादी आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबार करताना त्यांनी जेवढेही हिंदू लोकं होते त्या सगळ्यांना पकडून धमकी दिली की, तुम्ही अजान म्हणा. जर नाही म्हणालात तर गोळ्या मारू.
त्यावेळी तिथे माझे काका आणि वडीलही तिथेच होते. त्या दोघांनाही त्यांनी गोळ्या मारल्या. मोदींचं नाव ते आम्हाला बोलत होते की, तुम्ही मोदींना डोक्यावर बसवून ठेवलंय. तुमच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे. असं ते बोलत होते.
आम्ही महाराष्ट्रातील पुण्यातून आहोत. माझ्या बाबा आणि काकांना गोळ्या लागल्या आहेत. आम्ही आता पहलगाममध्ये आलो आहोत. मी आई आणि काकीसोबत आहे. आम्हाला काहीही अपडेट नाहीत. 3.30-4.00 वाजेच्या दरम्यान हल्ला झाला. तेव्हापासून आम्हाला काही अपडेट मिळालं नाही.
माझ्यासमोरच हे सगळं घडलं. आम्ही सगळे एका टेंटच्या मागे लपलेलो. ते तिथे आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना तिथून उचललं आणि गोळ्या मारल्या. माझे काका खाली झोपले होते त्यांना गोळ्या मारल्या. आमच्या बाजूला एक कुटुंब होतं. त्यांच्यामधील 2 लोकांना गोळ्या मारल्या. आम्हाला सांगितलं की, अजान म्हणा नाहीतर आम्ही तुम्हालाही गोळ्या मारू.










