Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याकांड! दोन मोठी कारणं आली समोर
Baba Siddique Murder Case Latest Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकी कारणे कोणती?
लॉरेन बिश्नोई गँगचं बाबी सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेमागे कनेक्शन काय?
सिद्दीकींच्या हत्येचा कट लॉरेन बिश्नोई गँगने रचला होता का?
Baba Siddique Murder Case Latest Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. परंतु, या हत्येमागंची नेमकी कारणे कोणती आहेत? सिद्दीकींच्या हत्येचा कट लॉरेन बिश्नोई गँगने रचला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिद्दीकींच्या हत्येमागे दोन मोठी कारणे असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
सलमान खान लॉरेन बिश्नोई गँगपासून दूर नाही, असं सलमानला भासवून द्यायचं. मुंबईच्या श्रीमंत लोकांकडून मोठी खंडणी वसूल करणं, हे यामागचं दुसर कारण असू शकतं. याआधी एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली होती. सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर करण्यात आली, त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव लिहिण्यात आलं होतं. तपास यंत्रणांना असं वाटतं की, मुंबईत दाऊदचं वर्चस्व राहिलं नाही, हे दाऊदचं नाव लिहिण्यामागचं कारण आहे. सलमान खानच्या घरावर फायरिंग करून लॉरेन बिश्नोई गँग मुंबईत खंडणीचं मोठं मार्केट उभं करण्याचा प्रयत्न करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नाही, हे गँगस्टर लोकांना माहित आहे. त्यामुळे जी मुलं छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सामील असतात, त्यांना गँगमध्ये रिक्रुट केलं जातं. त्यांच्या माध्यमातून दुश्मनांचा काटा काढला जातो. काम झाल्यानंतर त्यांना परदेशात पाठवलं जाईल, असं बिश्नोई गँगकडून या मुलांना सांगण्यात येतं. या अमिषामुळे तरुण मुलं कोणत्याही थराला जाऊन गंभीर गुन्हे करतात.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> धमकी, रेकी, फायरिंग आणि मित्राची हत्या...लॉरेन बिश्नोईने सलमान खानला कसं केलं भयभीत? वाचा Inside Story
26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
1998 ला सप्टेंबर महिन्यात 'हम साथ साथ है' सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. सलमानपासून सैफ अली खान आणि तब्बूसारखे सेलिब्रिटी राजस्थानच्या जोधपूरमध्ये शुटिंगसाठी गेले होते. 1998 ला 27-28 सप्टेंबरच्या रात्री घोडा फार्म हाऊसमध्ये काळवीटची शिकार करण्यात आली होती. याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या कांकाणी गावात रात्री 2 च्या सुमारास शेतात अंधार असताना हेडलाईटचा प्रकाश पडला. सफेद रंगाची जिप्सी एकाच परिसरात फिरत होती. काळवीटाची शिकार करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते, असा संशय लोकांना होता. याचदरम्यान गोळीबारीचा आवाज झाला. गावकरी घटनास्थळी पोहोचल्यानंतर काळवीटचा शिकार झाल्याचं त्यांना कळलं.
सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर
गेल्या अनेक वर्षामध्ये सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. लॉरेन बिश्नोई आणि भारत-कॅनडाचा वाँटेड गँगस्टर गोल्डी बरारने अनेकदा सलमान खानची हत्या करण्याची घोषणा केली होती. बिश्नोई आणि गोल्डी बरारने मुंबईत सलमानची हत्या करण्यासाठी शूटर पाठवले होते. लॉरेनचा खास गँगस्टर संपत मेहरा 2018 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करण्यासाठी आला होता. परंतु, हरियाणा पोलिसांन नेहराला आधीच अटक केली. त्याला रिमांडमध्ये घेतल्यानंतर सलमान खानच्या हत्येचा पूर्ण प्लॅनिंग त्याने सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट कुणी रचला? लॉरेन बिश्नोईने 9 दिवसांचा उपवास केला अन्..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT